मुख्यमंत्र्यांनीच आनंद दिघेंची प्रॉपर्टी हडपली - संजय राऊत यांचा आरोप
![]() |
आनंद आश्रम, ठाणे |
मुंबईत जशी 'मातोश्री' शिवसेनेची प्रापर्टी आहे तशी ठाण्यात 'आनंद आश्रम' ही आनंद दिघे यांची प्रॉपर्टी आहे. मात्र या ठिकाणी सातबारा आपल्या नावावर करून मुख्यमंत्र्यांनी आनंद दिघे यांची प्रॉपर्टी हडपली आहे असा गंभीर आरोप यावेळी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेच्या नावावर वाम मार्गाने शिंदे गटाने कोट्यवधी कमवले आणि भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले. आनंद दिघे यांच्यावर काढलेला सिमेनाही खोटा असून हा आनंद दिघे यांचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. सत्ता आल्यावर राजन विचारे केंद्रात मंत्री झाले पाहिजे असा उल्लेखही राऊत यांनी शेवटी आपल्या भाषणात केला. आपल्या भाषणात संजय राऊत म्हणाले, ४ जून नंतर नरेंद्र मोदी भारतात राहणार नाही, इंग्रजांनी जेवढा देश लुटला नसेल तेवढा यांनी लुटला असून मोदी आणि अमित शहा यांचे पासपोर्ट जप्त करा अशी मागणी राऊत यांनी केली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्र चालवावा एवढे वाईट दिवस महाराष्ट्रावर आले नाहीत असे राऊत यांनी सांगितले.
राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ठाण्यातील मनोरमा नगर या ठिकाणी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, आनंद दुबे, कॉंग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, आशिष गिरी, शिवसेनेच्या ज्योती ठाकरे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा मोहिते, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष सुहास देसाई, विक्रम खामकर, सुजाता घाग, आपचे धनंजय शिंदे, सतीश सलुजा, संभाजी ब्रिगेड चे चंद्रशेखर पवार, , रिपब्लिक पार्टीचे दयानंद उल्मिक, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, उपजिल्हाप्रमुख ब्रिजेश तिवारी तसेच महाविकास आघाडीचे इतर प्रमुख नेते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.