"माझी माती, माझा देश' या कार्यक्रम अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त मार्गदर्शनाखाली "अमृत कलश यात्रा" आयोजन


केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार "माझी माती, माझा देश" या कार्यक्रम अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी "अमृत कलश यात्रा आयोजन करण्यात आले. प्रसंगी अति. आयुक्त अनिकेत मानोरकर, अति. आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त रवि पवार, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबित, सर्व प्रभागनिहाय सहा. आयुक्त मनपा अधिकारी/कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या यात्रेत उपस्थित होते.


"माझी माती, माझा देश" हा उपक्रम राज्यात दिनांक 09 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यत राबविण्यात आला. त्या अनुषंगाने महापालिकेने अमृत कलश यात्रा" आयोजित करून या कार्यक्रमाचा समारोप केला. प्रत्येक प्रभागातून माती असलेला कलश घेऊन सावित्रीबाई फुले उद्यान ते बुद्धविहार पर्यंत यात्रा काढण्यात आली. यामध्ये एनसीसी युनिट, एनएसएस युनिट, शाळेचे/ महाविद्यालयाचे विद्यार्थी, महापालिका अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. अमृत कलश यात्रा ही बुद्धविहार येथे समाप्त करण्यात आली व सहा प्रभागातून आलेल्या सहा कलशांमधील माती ही आयुक्त यांच्या हस्ते एकाच कलशामध्ये संकलित करण्यात आले. 


त्यानंतर सर्वांनी एकत्रित येऊन पंचप्रण शपथ घेतली. आपले शहर, राज्य आणि आपला देश हा स्वच्छ कसा होईल यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांबरोबर सर्व नागरिकांनी देखील पुढे येऊन स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.) यांनी केले आहे.