बिल्डर द्वारे २०३ सदनिका मिरा भाईंदर महानगरपालिकेला सुपूर्त
सदर गृहसंकुलातील महानगरपालिकेस हस्तांतरीत होणारी इमारत प्रकार ई. या इमारतीस दिनांक ४ डिसेंबर २०१५ रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली होती व दिनांक २० फेब्रुवारी २०१७ रोजी जोत्याचा दाखला देण्यात आला आहे. सदरची इमारत व त्याखालील जमीन संबंधित विकासकाने मिरा भाईंदर महानगरपालिकेस दिनांक ०२ जून २०२३ रोजी नोंदणीकृत करारनाम्याद्वारे हस्तांतरित केली आहे व सदर इमारतीमधील २०३ सदनिकांच्या चाव्या विकासकाने दिनांक २३ ऑगस्ट २०२३ रोजी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांस सुपूर्त केल्या आहेत. सदर प्रसंगी अति. आयुक्त संभाजी पानपट्टे, सहा. संचालक नगररचना दिलीप घेवारे, उपायुक्त संजय शिंदे व कार्यकारी अभियंता नितीन मुकणे उपस्थित होते.