घोडबंदर किल्ला बुरुजावरील 100 फूटी ध्वज व नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन भूमिपूजन सोहळा संपन्न

मिरा भाईंदर :- आज दिनांक 15 ऑक्टोबर 2022 रोजी मा. श्री. युवराज संभाजी राजे छत्रपती माजी राज्यसभा सदस्य यांच्या शुभहस्ते मिरा भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास मा. ना. श्री. कपिल पाटील राज्यमंत्री, पंचायती राज मंत्रालय, भारत सरकार, मा. ना. श्री. शंभूराज देसाई मंत्री, राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा, मा. श्री. प्रताप सरनाईक विधानसभा सदस्य ओवळा माजिवाडा, मा. श्रीम. गीता जैन विधानसभा सदस्य मिरा भाईंदर, मा. श्री. छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले विधानसभा सदस्य, मा. श्री. नितेश राणे विधानसभा सदस्य कणकवली, मा. श्रीमती ज्योतिताई मेटे, आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले, डॉ. संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त, श्री. अनिकेत मनोरकर अतिरिक्त आयुक्त, शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या शूर माता ज्योती राणे व शूर पिता प्रकाश राणे, मराठा समाजाचे अध्यक्ष सुरेश दळवी, मराठा समाज संघाचे पदाधिकारी, महानगरपालिका सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सर्वप्रथम मा. श्री. युवराज संभाजी राजे छत्रपती माजी राज्यसभा सदस्य यांच्या शुभहस्ते घोडबंदर किल्ला बुरुजावरून 100 फुटी ध्वजाचे भूमिपूजन व नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. तदनंतर सर्व मान्यवरांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह इथे उपस्थित राहून महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कलाकारांनी आपली कला सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथांची गाथा पोवड्यातून सादर केली. 

सांस्कृतिक कार्यक्रम समाप्तीनंतर बारवी धरणातील 210 धरणग्रस्त कुटुंबियांच्या सदस्यांना महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर प्रसंगी सर्व मान्यवर, पोलीस प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, उपस्थित नागरिक, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी वेळात वेळ काढून घोडबंदर किल्ला 100 फूटी ध्वज व नरवीर तानाजी मालुसरे मराठा भवन भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिल्याबद्दल मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.