माझी वसुंधरा अभियानांतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेला पुरस्कार !

माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत भूमी , जल , वायू , अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित राज्य शासनाच्यावतीने स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धे अंतर्गत अमृत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेचा समावेश आहे . माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संवर्धन , संरक्षण व जतन करण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेने केलेल्या सर्वोत्तम कामगिरी बाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांचे वतीने आज रविवारी, नरीमन पाईंट , मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मिरा भाईंदर मनपा आयुक्त दिलीप ढोले , महापौर ज्योत्स्ना हसनाळे , अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे , उपायुक्त संजय शिंदे यांना सन्मानित करण्यात आले आहे.











मिरा भाईंदर महानगरपालिकेने गेल्या काही महिन्यांमध्ये स्वच्छता अभियानाच्या बाबतीत घेतलेला पुढाकार व मिरा भाईंदर शहरांमध्ये केलेले वेगवेगळे बदल यांची दखल घेत या पुरस्कारासाठी मिरा भाईंदर महानगरपालिकेची निवड करण्यात आली आहे.  

माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा सन्मान सोहळा मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली , मा . उप मुख्यमंत्री , मा . मंत्री , महसूल , मा . मंत्री , नगर विकास , मा . मंत्री ग्राम विकास , मा . मंत्री , पाणी पुरवठा व स्वच्छता , मा . मंत्री पर्यावरण व वातावरणीय बदल आणि मा राज्यमंत्री , पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तसेच ,मा.प्रधान सचिव सौ.मनिषा म्हैसकर मॅडम यांचे उपस्थितीत टाटा थिएटर , एन.सी.पी.ए. , नरीमन पाईंट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला.


"पालिकेचे सर्व विभागांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे."

 - दिलीप ढोले, आयुक्त , मिरा भाईंदर मनपा.

"आमचे मा.आयुक्त श्री दिलीप ढोले सर यांच्या मार्गदर्शन आणि प्रोत्साहनामुळेच आम्ही हा पुरस्कार मिळू शकलो. यावर्षी सुध्दा आम्ही माझी वसुंधरा अभियान -३.० साठी अजून जोमाने काम करू." 

- संजय शिंदे , उपयुक्त, मिरा भाईंदर मनपा.