व्हिडीओ पार्लरमध्ये लागणा-या अश्लिल सिनेमा पाहून अल्पवयीन मुली व महिला बघितल्यास गैरकृत्य करणा-या सवयीच्या गुन्हेगारास गुन्हे शाखा युनिट -१ , काशिमिरा यांनी केले जेरबंद .

दिनांक १८/०४/२०२२ रोजी एका अल्पवयीन ( ०९ वर्षे ) मुलीसोबत केलेल्या गैरकृत्याबाबत नयानगर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र . २५७/२०२२ भा.द.वि. कलम ३७६ सह पोक्सो कलम ८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता . अल्पवयीन मुलीसोबत सदरचा गुन्हा घडल्याने स्थानिक लोकांमध्ये असंतोष व भितीचे वातावरण निर्माण झाले होते . आरोपीताकडून अशाप्रकारचे गुन्हयाची पुनरावृत्ती होउ नये व जनमाणसांत सुरक्षिततेची भावना कायम राहवी हे अत्यंत महत्वाचे असल्याने आरोपीतास लवकरात लवकर अटक करणे आवश्यक होते . 

त्याप्रमाणे वरिष्ठांच्या आदेश व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शाखा युनिट १ , काशिमिराचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयातील घटनास्थळी भेट देउन येणारे जाणारे मार्गाची पाहणी करून माहिती घेतली असता आरोपीत हा घटनास्थळी येतांना नालासोपारा येथून ट्रेनने मिरारोड येथे आल्याचे समजले . तसेच घटनेनंतर सदर आरोपीत हा मिरारोड येथून मुंबई येथे गेल्याचे समजले . प्राप्त माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करुन आरोपीत नामे कल्पेश गोपीनाथ देवधरे वय ३० वर्षे व्यवसाय ड्रायव्हर , रा . कांदिवली ( प ) , मुंबई यास नालासोपारा येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे . 




आरोपीताकडे केलेल्या तपासामध्ये त्याचे वय १६/१७ वर्षे असताना व्हिडीओ पार्लरमध्ये लागणा-या अश्लिल सिनेमा पाहून अल्पवयीन मुली व महिला बघितल्यास त्याचे मनामध्ये विकृत भावना निर्माण होउन अशा प्रकारचे गुन्हे करण्याची सवय लागली अशी माहिती मिळाली आहे . नमुद आरोपीता संदर्भात माहिती घेता त्याचे विरुध्द खालील नमुद प्रमाणे विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद असल्याची माहिती मिळाली आहे . 


तसेच नमुद आरोपीत याने दादर सेंट्रल पोलीस ठाणे गु.र.क्र . ८४ ९ / २०२१ भा.द.वि. कलम ३५४ अन्वये गुन्हा केल्याची माहीती मिळाली असून सदर गुन्हयात तो पाहीजे आरोपी असल्याचे समजले आहे . सदरची कामगिरी डॉ . श्री महेश पाटील , पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) , श्री अमोल मांडवे , सहा . पोलीस आयुक्त ( गुन्हे ) यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट १ काशिमिरा गुन्हे शाखेचे पो.नि. अविराज कुराडे , स.पो.नि. कैलाश टोकले , स.पो.नि. पुष्पराज सुर्वे , पो.उप.नि. हितेंद्र विचारे , स.पो.उप.नि. राजेंद्र वेदपाठक , स.पो.उप.नि. राजु तांबे , किशोर वाडीले , अर्जुन जाधव , संदिप शिंदे , पो.हवा . संजय शिंदे , अविनाश गजें , मुस्तकीन पठाण , पुषेंद्र थापा , संतोष लांडगे , सचिन सावंत , पो . शि . प्रशांत विसपुते , विकास राजपुत व सुमित जाधव यांनी केली आहे .