मिड टाऊन लोजिंग चे अनधिकृत बांधकाम संदर्भात MRTP कायद्यानुसार फिर्याद दाखल.

मीरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती क्र.१ चे प्रभाग अधिकारी संजय दोंदे यांनी डोंगरी येथे अनधिकृत रित्याने बांधण्यात आलेले मिड टाऊन लोजिंग च्या चालक / मालक " डॉक्टर नीरज शिवपूजन गुप्ता " यांचे विरुद्ध उत्तन सागरी पोलीस ठाण्यात MRTP कायद्यानुसार गुन्हा दाखल करने बाबत लेखी फिर्याद दिनांक २१/०१/२०२१ रोजी दिल्याची माहिती मिळाली आहे.



सदर बांधकाम विरुद्ध महानगरपालिकेत अनेक तक्रारी दाखल असून आजपर्यंत या अनधिकृत लोजिंग चे बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली नाही. तर काही दिवसांपूर्वी भाईंदर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सह अन्य पोलीस कर्मचारी यांनी उशीर रात्री या लॉजमध्ये धाड टाकून एका प्रेमीजोड्यांबरोबर कायद्या विरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात वरीष्ठ पोलीस अधिकारियांकडे तक्रारी दाखल केली होती.

या विवादित लॉज ला लागून ही एका मिड टाऊन रेस्टॉरंट नामक व्यवसायाचा पत्राशेड व्यक्तिरीत अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाई करण्याकरिता विधी विभागामार्फ़त प्रभात अधिकारी यांना २७/११/२०१९ रोजी पत्र पाठविले होते , मात्र त्या पत्रावर आजपर्यंत कोणतीही कारवाई प्रभाग अधिकारी मार्फत करण्यात आली नाही.