कोणत्याही प्रकरणाची प्रस्ताव सात दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहिल्यास संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल - आयुक्त डॉ. विजय राठोड

मिरा-भाईंदर शहराशी निगडीत असलेल्या नागरी प्रश्नांची तात्काळ पुर्तता करण्याऐवजी या संदर्भातील प्रस्ताव प्रलंबित ठेवणाऱ्या कामचोर अधिकारी/कर्मचाऱ्यांविरूद्ध आता महापालिका आयुक्त डॉविजय राठोड यांनी बडगा उगारला आहेसंबंधित अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकरणाचा प्रस्ताव सात दिवसांपेक्षा जास्त दिवस प्रलंबित राहिल्यास अशा अधिकाऱ्यांविरोधात जबाबदारी निश्चित केली जाऊन कारवाई केली जाईलअसा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.


 मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विविध विभागामार्फत पार पाडण्यात येणाऱ्या कर्तव्यात जबाबदारी सोपवून दिलेल्या कर्मचाऱ्यांमार्फत त्यांच्या वरिष्ठांकडे फाईल मान्यतेसाठी शिफारस करण्यात येत असतातपरंतु वरिष्ठ अधिकारी या फाईल कंत्राटदार तसेच विकासक भेटण्यास आल्याशिवाय संबंधित फाईलवर शेरा मारून फाईल पुढील मान्यतेसाठी पाठवित नाहीतत्यामुळे विविध विभागांच्या विकासकामांना नाहक विलंब होत आहे.

सबब सर्व संबंधित विभाग अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असणाऱ्या नस्तींची माहिती घेण्यात यावी आणि फाईलचा निपटारा न करता दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावीतसेच मागील एक महिन्यांच्या कालावधीतील विविध विभागात कोणकोणत्या अधिकारी/कर्मचारी यांच्याकडे किती दिवस फाईलकोणत्या कारणासाठी प्रलंबित आहेयाची चौकशी करावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना फाईलचा निपटारा करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ ठरवून द्यावातसेच संबंधितांना समज देऊन यापुढे फाईल प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व गतिमान तथा पारदर्शक प्रशासन चालविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकावेअशी मागणी सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी आयुक्त डॉविजय राठोड यांच्याकडे केली आहे.

या मागणीची दखल घेऊन आयुक्त राठोड यांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकरणाची नस्ती सात दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहिल्यास जबाबदारी निश्चित करून संबंधितांविरोधात कारवाई केली जाईलअशी सक्त ताकीद दिलेली आहे.