ULC scam accused builder Shailesh Shah once again arrested by Crime Branch under section 420 and 471 of IPC ; Remanded till 20 March 2020.

मीरा भायंदर येथे बिल्डर शैलेश शाह यांना काशीमीरा क्राइम ब्रांच द्वारे मंगलवार , १७ मार्च २०२० रोजी बेकायदेशीरपणे शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करुन भायंदर पश्चिम येथील जूना सर्वे क्र. ५५४ , ५५५ , ५५६ , ५५७ , ५६६ , ५६७ , ५७० , ५७१ , ५७६ , ५७८ , ६८१ आणि ६८४ याच्यात वेगवेगळ्या हिस्सेची जमिनीचे व्यवहार स्वतःची पत्नीचा नावावर करण्याचा संदर्भात भायंदर पोलिस स्टेशन येथे दिनांक १२ मार्च २०२० रोजी दाखल गुन्हे अनुसार अटक केले होते , सुत्रांद्वारे मिळालेली माहिती नुसार पोलिसांना २० मार्च २०२० पर्यन्त अटक केलेले आरोपींची कस्टडी मिळाली. मूर्धा गावाचा रहिवासी पदमाकर वामन भोईर यांना रामचंद्र वैष्णव यांनी शैलेश शाह व त्यांची पत्नी श्रीमती साधना शाह यांनी फसवणूक केलेबाबत तक्रारी अर्ज दाखवला , सदार्चा तक्रारी अर्ज वाचून पदमाकर वामन भोईर यांनी खालील प्रमाणे भायंदर पोलिस ठाण्यात तकरार दाखल केली.

तक्रारदार पदमाकर वामन भोईर यांचे आजोबा यांना श्री.वामन भोईर व श्री.लक्ष्मण भोईर असे दोन मुले होती. त्या दोघांची वरील उक्त जमीन आहे. पदमाकर भोईर यांचे वडील श्री.वामन भोईर यांना श्री.पदमाकर भोईर, श्री आत्माराम वामन भोईर, श्रीमती ताईबाई कमलाकर पाटील, श्रीमती शंकुतला हरेश्वर किणी, श्रीमती प्रभावती महादेव पाटील असे मुले आहेत तसेच पदमाकर वामन भोईर यांचे काका श्री.लक्ष्मण भोईर यांना श्री.पांडुरंग भोईर, श्री.केशव लक्ष्मण भोईर, श्री.प्रभाकर लक्ष्मण भोईर, श्री.विश्वानाथ लक्ष्मण भोईर, श्री.परमानंद लक्ष्मण भोईर, श्रीमती चंपुबाई भास्कर पाटील असे मुले आहेत। श्री.वामन भोईर यांचे वरील जमीनीच्या 7/12 वर नाव नव्हते. श्री.वामन भोईर यांचे सन 1978 मध्ये मयत झाले. श्री .वामन भोईर यांचे मुले असुन सदर जमीनीचे 7/12 वर कायदेशीर वारस असतांना देखील तक्रारदार पदमाकर वामन भोईर व इतरचे नावे नव्हते.

सदर जमीनीचे 7/12 वर नावे लागणेकरीता तक्रारदार पदमाकर वामन भोईर यांनी सन 1989 मध्ये उपविभागीय अधिकारी ठाणे यांचेकडे  क्र. 42/1989  नूसार अर्ज दाखल केला. सदर अर्जाची सुनावणी होवुन, दिनांक 29/07/1989 रोजीला तक्रारदाराची नावे सदर जमीनीचे 7/12 वर लावण्याचे आदेश पारीत झाले. उपविभागीय अधिकारी ठाणे यांचे आदेशाचे विरोधात तक्रारदार पदमाकर वामन भोईर यांचे काका श्री. लक्ष्मण भोईर यांची मुले श्री.पांडुरंग भोईर व इतर उपजिल्हाधिकारी ठाणे यांचेकडे अपील दाखल केले. सदरच्या अपीलावर सुनावणी होवुन पदमाकर वामन भोईर यांचे बाजुने निर्णय झालेला होता .

त्यावर पुन्हा श्री.पांडुरंग भोईर व इतर यांनी उपजिल्हाधिकारी ठाणे यांनी दिलेले आदेश रद्द होणेकरीता अपर आयुक्त कोकन विभाग यांचेकडे अपील दाखल केले. सदरचे अपीलाची सुनावणी होवुन पदमाकर वामन भोईर यांचे विरोधात आदेश पारीत झाले म्हणुन पदमाकर वामन भोईर यांनी त्यावर मा. राज्यमंत्री, महसुल विभाग यांचेकडे अपील दाखल केले. दाखल केलेल्या सदर अपीलावर दिनांक 22 ऑगस्ट 2003 मध्ये पदमाकर वामन भोईरचे बाजुने निर्यण होवुन, अपर आयुक्त, कोकण विभाग यांचे आदेश रद्द करुन, जो उपविभागीय अधिकारी ठाणे व उपजिल्हाधिकारी ठाणे यांचेकडील आदेश कायम केले.

त्याप्रमाणे सन 2003 मध्ये वरील जमीनीचे 7/12 वर लक्ष्मण भोईर यांचे मुलांचे सोबत वामन भोईर यांचे वारसांचे नावे लागलेली आहेत. राज्यमंत्री महसुल विभाग यांनी पदमाकर वामन भोईरचे बाजुने निर्यण दिल्यानतंर त्यांचे विरुध्द पांडुरंग भोईर व इतर यांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे सिव्हील न्यायालय मुंबई येथे सिव्हील रिट पिटीशियन क्रमांक 6551/2003 दाखल केले होते. सदर रिट मा. उच्च न्यायालयाने निकाली कादुन, महसुल विभागाने दिलेल्या आदेशात हस्तक्षेत करण्यायोग्य असे कारण नसुन, पदमाकर वामन भोईर यांना मा. सिव्हील न्यायालय ठाणे येथे श्री.पांडुरंग भोईर व इतर यांचे विरुध्द दाखल केलेल्या दाव्यात दाद मागुन घ्यावी असा निर्यण देवुन सदरचे पिटीशियन निकाली काढलेले आहे.

अशाप्रकारे सन 2003 मध्ये पदमाकर वामन भोईर यांचे 7/12 वर नावे आल्याने, तसेच वेळोवेळी महसुल विभाग व न्यायालयाकडुन पदमाकर वामन भोईरचे बाजुन निर्णय झाल्याने त्यांनी श्री.पांडूरंग भोईर व इतर यांचे विरुध्द मा.सिव्हील न्यायालय ठाणे येथे दाखल केलेले रेग्युलर सिव्हील सुट क्र. 61/1997 बिनर्शत विड्रल केलेले आहे.

तत्पुर्वी 2001 मध्ये पदमाकर वामन भोईरचे सदर जमीनीचे 7/12 वर नावे नसतांना, श्री.लक्ष्मण भोईर यांचे मुले पांडुरंग भाईर व इतर 37 यांनी सदरची सर्व जमीन शैलेश शेवंतीलाल शहा यांचे सोबत रु. 2,19,64,689/- व्यवहार करुन त्यांचे नावे Agreement for sale cum Development (अग्रीमेंट फॉर सेल कम डेव्हलपमेंट) व Irrevocable General Power of Attorney (कधीही न संपणारे कुलमुख्त्यार पत्र) असे कागदपत्रे बनवुन दिलेली होती. पदमाकर वामन भोईर यांचे  माहीतीनुसार सदर वेळी शैलेश शेवंतीलाल शहा यांनी पांडूरंग व इतर यांना रु.29,00,000 रुपये दिले होते. उर्वरित रक्कम रु. 1,90,64,689/- तिन वर्षात देण्याचे ठरले असतांना देखील शैलेश शेवंतीलाल शहा सदरची रक्कम त्यांना दिलेली नाही. दिनांक 26.07.2001 रोजीच्या Agreement for sale cum Development मधील 6 व 7 पानावर पदमाकर वामन भोईरचे व पांडुरंग भोईर यांचेत दाखल असलेले रेग्युलर सिव्हील सुट क्र. 61/1997 व राज्यमंत्री महसुल विभाग यांचेकडे दाखल असलेले रिव्हीजन अपील क्रमांक 90/1995 प्रलंबीत असल्याचे नमुद केलेले आहे. म्हणजेच पदमाकर वामन भोईरचे व ह्यांचे काका लक्ष्मण भोईर यांची मुले पांडूरंग भोईर व इतर यांच्यामध्ये सदर जमीनी संदर्भात असल्याचे व सन 2003 मध्ये पदमाकर वामन भोईरचे 7/12 वर नावे चढलेली आहेत याची शैलेश शहा यांना पुर्ण जाणीव व माहीती असतांना देखील पदमाकर वामन भोईरचा कायदेशीर हक्क आहे हे लपविणेकरीता, सन 2010 मध्ये शैलेश शेवंतीलाल शहा यांनी, सन 2000 चा फक्त लक्ष्मण भोईर यांचे वारस पांडूरंग व इतर यांची नावे असलेला 7/12 लावून वरील सर्व जमीन दिनांक 08 एप्रिल 2010 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय ठाणे यांचे कार्यालयात जावुन स्वत:चे पत्नी सौ. साधना शैलेश शहा यांचे नावे कायम खरेदीखत करुन दिलेले असुन त्याचा दस्त क्र. टनन/04/03688/2010 असा आहे.

अशा प्रकारे श्री. शैलेश शेवंतीलाल शहा व त्यांची पत्नी सौ. साधना शैलेश शहा दोन्ही आपसात संगनमत करून, वरील जमीनीमध्ये पदमाकर वामन भोईर व त्यांचे भाऊ आणि बहीनीचा 50 टक्के कायदेशीर हक्क आहे, त्याबाबत विविध महसूल विभाग व न्यायालयाकडुन पदमाकर वामन भोईर व इतरचे बाजुन निर्णय झालेला आहे व सन 2003 मध्ये पदमाकर वामन भोईर व त्यांचे कुटंबातील व्यक्तीची नावे 7/12 वर नावे चढलेली आहेत, असे माहीत असून व ती बाब लपवुन फसवणुक करण्याचे उददेशाने, दिनांक 08 एप्रिल 2010 रोजी पदमाकर वामन भोईरचे नावे असलेला 7/12 वापरणे आवश्यक असतांना देखील तो 7/12 न वापरता, सन 2000 चा पदमाकर वामन भोईरचे नावे नसलेला 7/12 वापरुन, दय्यम निंबधक कार्यालय ठाणे येथे सदरची जमीन त्याची पत्नी श्रीमती साधना शहा यांचे नावे त्यावेळच्या बाजार मुल्यदर सुमारे 10 करोड पेक्षा जास्त असतांना सुध्दा कमी किंमतीत म्हणजे निव्वळ रु. 41,75,000/- किंमतीस विकुन कायमखरेदी खत करुन देऊन पदमाकर वामन भोईर व शासनाची फसवणुक केलेली आहे.

भायंदर येथे बिल्डर शैलेश शाह यांना काशीमीरा क्राइम ब्रांच द्वारे मंगलवार , १७ मार्च २०२० रोजी बेकायदेशीरपणे शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करुन भायंदर पश्चिम येथील जूना सर्वे क्र. ५५४ , ५५५ , ५५६ , ५५७ , ५६६ , ५६७ , ५७० , ५७१ , ५७६ , ५७८ , ६८१ आणि ६८४ याच्यात वेगवेगळ्या हिस्सेची जमिनीचे व्यवहार स्वतःची पत्नीचा नावावर करण्याचा संदर्भात भायंदर पोलिस स्टेशन येथे दिनांक १२ मार्च २०२० रोजी दाखल गुन्हे अनुसार अटक केले होते , सुत्रांद्वारे मिळालेली माहिती नुसार पोलिसांना २० मार्च २०२० पर्यन्त अटक केलेले आरोपींची कस्टडी मिळाली. मूर्धा गावाचा रहिवासी पदमाकर वामन भोईर यांना रामचंद्र वैष्णव यांनी शैलेश शाह व त्यांची पत्नी श्रीमती साधना शाह यांनी फसवणूक केलेबाबत तक्रारी अर्ज दाखवला , सदार्चा तक्रारी अर्ज वाचून पदमाकर वामन भोईर यांनी खालील प्रमाणे भायंदर पोलिस ठाण्यात तकरार दाखल केली.